Posts

ताटातुटीचे वर्तमान

ताटातुटीचे वर्तमान: शिकवण एकतेची!       ज्येष्ठ साहित्यिक,‌ ज्ञानार्जनाचा पेशा आवडीने,‌प्रामाणिकपणे करणारे शशिकांत शिंदे यांचा नावलौकिक आहे. विशेष म्हणजे त्यांची 'माणूसपण गारठलंय' ही कविता बालभारतीच्या इयत्ता सातवीच्या अभ्यासक्रमात होती. यावरून कवी शिंदे यांची कवितेवरील,‌ शब्दांवरील हुकमत आणि सामर्थ्य लक्षात येते. लेखक या नात्याने शशिकांत शिंदे यांच्या नावे पाच पुस्तके जमा आहेत. त्यांचा 'ताटातुटीचे वर्तमान' हा विविध विषयांवरील काव्य असलेला संग्रह वाचण्याचा योग आला.‌ अक्षर मानव प्रकाशन,‌ पुणे यांनी अत्यंत दर्जेदार स्वरूपात हा संग्रह प्रकाशित केला आहे.‌ संग्रहाचे मुखपृष्ठ अत्यंत बोलके आणि आशय स्पष्ट करणारे आहे. या कवितासंग्रहात शंभरपेक्षाही अधिक आशयघन कवितांचा समावेश केला आहे.‌बहुतांश‌ कविता ह्या सामाजिक जाणिवांवर आधारित आहेत. कळतनकळत बिघडत चाललेल्या सामाजिक घडामोडींवर परखड भाष्य करताना कवी शिंदे यांची लेखणी डगमगत नाही.‌ म्हणूनच कवी शशिकांत शिंदे 'कवितेसाठी' या काव्यात उद्विग्न होऊन लिहितात... दहशतवादाच्या विरोधात ज्यांनी शस्त्र उपसले  आणि जे शहीद झाले त्यांच्...

असा मी असामी

माझे वडील प्राथमिक शिक्षक होते. पहिली-दुसरीचा वर्ग मी त्यांच्या हाताखालीच शिकलो. त्यांना वाचनाची आवड होती. ग्रामपंचायतीच्या वाचनालयात बसून वर्तमानपत्रातील शब्द आणि शब्द ते वाचून काढीत असत. त्यांचे बोट पकडून मीही असाच कधीतरी वाचनालयातल्या बाकावर जाऊन बसलो. तिथेच मला किशोर, चांदोबातल्या बोलक्या चित्रांनी भुरळ घातली. तेव्हापासून विक्रम आणि वेताळ या कथामालेतील मानगुटीवर बसलेला वेताळ अजून उतरायला तयार नाही. वाचनानेच मला कधीतरी लेखनाची सर्जनशील वाट खुली करून दिली. नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. त्या सुट्ट्यांमध्ये कितीतरी पुस्तकांचा फडशा पाडला. गुप्तहेर कादंबऱ्यांसाठी प्रसिद्ध असणारे लेखक बाबा कदम यांची 'भालू' कादंबरी वाचनात आली. ती मला विलक्षण आवडली. नंतर झपाटल्यासारख्या त्यांच्या कितीतरी कादंबऱ्या वाचून काढल्या. आणि एका अनाम क्षणी काहीतरी लिहून गेलो. ती कविता असल्याचा नंतर साक्षात्कार झाला. कवितेने झपाटून टाकलं. तिनेच आईची ममता दिली. तिच्या निरपेक्ष वात्सल्यात नखशिखांत न्हाऊन निघालो. बहिणीच्या, पत्नीच्या रूपात ती भेटली. मैत्रीचं अलवारपण आणि मुलींची निरागसता हृदयात काठोकाठ भरत...